‘त्या’ यादीबाबत आम्ही आमचं काम केलं, राजू शेट्टींनी काय बोलाव हा त्यांचा निर्णय – शरद पवार
अमोल धर्माधिकारी | राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या यादीमध्ये आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांचं नाव दिलेलं आहे. आम्ही आमची सामायिकता पाळलेली आहे,राजू शेट्टींनी काय बोलावं हा त्यांचा अधिकार अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजू शेट्टींच्या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीकडून १२ आमदारांची यादी राज्यपालांकडे देण्यात आलेली आहे.मात्र अद्याप राज्यपालांकडून कुठलाही निर्णय आलेला नाही,आम्ही राज्यपालांच्या निर्णयाची वाट पहातोय…
९ महिने उलटूनही राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या यादीवर राज्यपालांकडून शिक्कामोर्तब न झाल्याने महाविकास आघाडी नाराज आहे. तर गेल्या दोन दिवसांपासून त्या' यादीतून राजू शेट्टी यांना वगळल्याची चर्चा सुरू झाली, आणि त्यामुळे राजू शेट्टी ही आक्रमक झाले आहेत, अखेर या सर्व वादावर आज शरद पवार यांनी पडदा टाकला आहे…