कोकणच्या सुपुत्राने आफ्रिकेत साजरी केली छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती

कोकणच्या सुपुत्राने आफ्रिकेत साजरी केली छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती

चिपळूणचे माजी नगराध्यक्ष लियाकत चौघुले यांचे सुपुत्र शरीक चौघुले यांचा विदेशात डंका

निसार शेख | चिपळूण : राज्यभरात शिवजयंती उत्साहात साजरी केली जात आहेत. अशातच कोकणच्या सुपुत्राने आफ्रिकेतील टांझानिया येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव साजरा केला. व विदेशात देखील छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्याची प्रथा सुरू केली आहे. त्यांचे संपूर्ण कोकणातून कौतुक केले जात आहे.

कोकणच्या सुपुत्राने आफ्रिकेत साजरी केली छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती
25 हजार स्केअर फुटात रांगोळीतून साकारले छत्रपती शिवरायांचे पोट्रेट

चिपळूण येथील माजी नगराध्यक्ष स्वर्गीय लियाकत चौघुले यांचे सुपुत्र शरीक चौघुले हे सध्या आफ्रिका देशातील टांझानिया येथे वास्तव्यास असून ते तेथील नगरसेवक देखील आहेत. कोकणच्या या सुपुत्राने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सव मराठी बांधवांना एकत्रित आणून साजरा केला.

आज संपूर्ण देशभरात छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव धुमधडाक्यात साजरा केला जात असतानाच परदेशातही आपले मराठी बांधव आपल्या राजांचा हा उत्सव साजरा करून जगभरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेचा प्रसार करताना पाहायला मिळत आहेत.

शरीक चौघुले यांनी आफ्रिकेत शिवजयंती उत्सव साजरा केल्याबद्दल गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी अभिनंदन केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती परदेशात साजरी करणाऱ्या शरीक चौघुले यांचे आता संपूर्ण कोकणातून कौतुक केले जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com