Raj Thackeray
महाराष्ट्र
Shetkari Kamgar Paksh Vardhapan Din : शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्यानिमित्त राज ठाकरे आणि संजय राऊत एकाच मंचावर
आज शेतकरी कामगार पक्षाचा 78 वा वर्धापन दिन आहे.
( Shetkari Kamgar Paksh Vardhapan Din ) आज शेतकरी कामगार पक्षाचा 78 वा वर्धापन दिन आहे. वर्धापन दिन पनवेल येथे आयोजित करण्यात आला आहे.आज पनवेल येथे शेकापचा वर्धापन दिन मेळावा होणार आहे. या मेळाव्याच्या मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित असणार आहेत. यासोबतच संजय राऊत देखील या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
त्यामुळं या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.लवकरच पनवेल महानगरपालिका त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. या मेळाव्यातून राज ठाकरे, संजय राऊत काय बोलतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.