Thane Shivsena
महाराष्ट्र
Thane Shivsena : ठाणे महापालिका निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेची सरशी; 75 जागांवर विजय
महापालिका निवडणुकांच्या मतदानानंतर काल मतमोजणी पार पडली.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Thane Shivsena) महापालिका निवडणुकांच्या मतदानानंतर काल मतमोजणी पार पडली. पालिका निवडणुकींचे निकाल हाती आले असून मुंबई महानगर पालिका निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळाल्याचे पाहायला मिळत आहे.
29 महानगरपालिकांमध्ये भाजपा-शिवसेनेच्या महायुतीने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. ठाकरे-पवार आणि काँग्रेसचा धुव्वा उडाला आहे. यातच आता ठाणे महापालिका निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेनं सरशी केली आहे.
ठाणे महापालिका निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेने 75 जागांवर विजय मिळवला आहे. ठाणे महापालिकेत शिवसेना मोठा भाऊ ठरला आहे. भाजपने 28 जागांवर विजय मिळवला असून ठाकरेंच्या शिवसेनेने 1 जागा मिळवली आहे.
Summary
ठाणे महापालिका निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेची सरशी
शिंदेंच्या शिवसेनेचा ७५ जागांवर विजय
भाजप २८ जागांवर विजयी
