शिरगाव व्यापारी मंडळ अध्यक्षपदी शिवराज कापडी तर उपाध्यक्षपदी निसार शेख
शिरगाव : चिपळूण तालुक्यातील शिरगाव व्यापारी मंडळ अध्यक्ष पदी शिवराज उर्फ बाबू कापडी यांची सर्वानुमते निवड झाली. यावेळी दहीहंडी आणि इतर कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. तसेच, मावळते कॅपेबल अध्यक्ष केशव गावनग यांनी पूर्ण क्षमतेने काम करून शिरगाव व्यापारी मंडळ यांचे नाव प्रगती पथावर नेऊन ठेवल्याबद्दल व्यापारी मंडळ यांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.
शिरगाव व्यापारी मंडळ यांची सभा नुकतीच पार पडली. यामध्ये विविध विषयावर सखोल चर्चा करण्यात आली. त्यामध्ये अध्यक्ष पदी शिवराज उर्फ बाबू कापडी, उपाध्यक्ष पदी संदीप आपी, पत्रकार निसार शेख, सेक्रेटरीपदी नितीन कोलगे, तेजस गावनंग, खजिनदारपदी दीपक मोहिते, सह खजिनदारपदी प्रशांत कारेकर तर संचालकपदी दत्तात्रय कोलगे, रमेश शिंदे, उदय देवळेकर, सदानंद आपीष्टे, अमीर कुटरेकर, अशोक लांबे, रविंद्र कासार, दत्ता बागवे, विठ्ठल मोहिते, संजय भागडे, रुचिराज भागडे, योगेश ताम्हणकर, सचिन आंबेकर, प्रसाद सावडेकर, सूरज मोहिते तर सल्लागारपदी रवी शिंदे, केशव गावनग, राजन शिंदे, सुरेश काटकर, स्वप्नील मोरे आदींची निवड करण्यात आली.
यावेळी शिरगाव व्यापारी मंडळ यांच्या वतीने शिरगावमध्ये शौचालय बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच राष्ट्रीय महामार्ग अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या अधिकारी यांची भेट घेण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. तसेच, शिरगाव व्यापारी मंडळ यांच्या युवा ग्रुपला कायम सहकार्य करण्याचे आभिवाचन नवनिर्वाचित अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी यांनी दिले आहे. व्यापारी यांच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेण्यात आला. त्यानंतर मावळते कार्यक्षम अध्यक्ष केशव गावनग यांना उत्तम कामगिरीबाबत व्यापारी मंडळ यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. तर नवनिर्वाचित अध्यक्ष शिवराज उर्फ बाबू कापडी आणि सर्व टीम याला नव्या वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.