नालेसफाईवरून शिवसेना आक्रमक; महापालिका प्रवेशद्वारावर टाकली नाल्यातली घाण

नालेसफाईवरून शिवसेना आक्रमक; महापालिका प्रवेशद्वारावर टाकली नाल्यातली घाण

Published by :
Published on

अकोला शहरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे महापालिकेच्या नालेसफाईची चांगलीच पोलखोल झाली आहे. महापालिकेने नालेसफाई न केल्याने अनेक नागरिकांच्या घरात नाल्याचे पाणी शिरले होते. त्यामुळे महापालिकेला नालेसफाईची आठवण करून देण्यासाठी आज महापालिका प्रवेशद्वारावर नाल्यातली घाण टाकत शिवसेनेने आंदोलन केले.

अकोला शहरात पहिल्याच पावसात नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. शहरातील बहुतांश नाल्याची सफाई न झाल्यामुळे नाल्यांचे घाणेरडे पाणी नागरिकांच्या घरात शिरले होते. त्यामुळे महापालिकेच्या भोंगळ कारभाराचा विरोध करण्यासाठी आज शिवसेनेच्या वतीने अकोला महानगरपालिकेच्या प्रवेश द्वारासमोर नाल्यातील घाण कचरा टाकत निदर्शने करण्यात आली. दरम्यान लवकरात लवकर नाल्याची सफाई न केल्यास आणखी तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com