‘शिवसेना सचिन वाझेंना वाचवत नाही’,जयंत पाटलांचे विरोधकांना प्रत्युत्तर

‘शिवसेना सचिन वाझेंना वाचवत नाही’,जयंत पाटलांचे विरोधकांना प्रत्युत्तर

Published by :
Published on

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात एपीआय सचिन वाझेंना कोठडी सुनावण्यात आली आहे. हे प्रकरण अर्थसंकल्पीय अधिवेशनात हि गाजले. यावेळी विरोधी पक्षाकडून सरकारला टार्गेट करत सचिन वाझे यांना शिवसेना वाचवत असल्याचा आरोप केला आहे. या आरोपावर आता जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विरोधकांना सुनावत स्पष्टीकरण दिले.

सचिन वाझे प्रकरणा संदर्भात बोलताना जयंत पाटील म्हणाले, "कुणी दोषी आढळलं तर त्याला योग्य ती शिक्षा मिळेल, अशी आमच्या सरकारची स्पष्ट भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सचिन वाझे यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात नाही. शिवसेनेकडूनही तसा प्रयत्न केला जात नसल्याचे स्पष्टीकरण देत विरोधकांचा आरोप खोडून काढण्यात आला.

दरम्यान गृहमंत्र्यांनी त्यांच्याकडची माहिती सभागृहात दिली होती. त्यांची तेव्हाची त्यावेळेची भूमिका योग्य असल्याचेहि पाटील म्हणाले. त्याचबरोबर हिरेन मृत्यू प्रकरणात अधिकारी सामील असतील तर तपास यंत्रणा कारवाई करतील असा विश्व त्यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर तपास यंत्रणेचा निष्कर्ष झाल्यावर निर्णय घेण्यात येईल",असे जयंत पाटील यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीसांनी तपास यंत्रणेला सीडीआर द्यावा

अंबानी यांच्या घराशेजारी आढळलेल्या स्फोटक प्रकरणात मनसुख हिरेन आणि एपीआय सचिन वझे यांच्यात फोनवरून झालेल्या संभाषणाचा सीडीआर असल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सीडीआर असेल तर त्यांनी तपास यंत्रणेला तो सीडीआर द्यावा, असे आवाहन पाटील यांनी फडणवीस यांना केले. त्याचबरोबर NIA वाहन कुणी ठेवले त्याचा तपास करत असल्याचे जयंत पाटील म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com