शिवसेना – राष्ट्रवादी आमदारांमध्ये जलपूजनाचा श्रेयवाद

शिवसेना – राष्ट्रवादी आमदारांमध्ये जलपूजनाचा श्रेयवाद

Published by :

प्रशांत जगताप, सातारा | कोरेगाव तालुक्यातील जिहे-कटापूर या महत्वकांक्षी योजनेचे नेर येथे आज भल्या पहाटे शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी जलपूजन केले तर याच कामाचे राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार शशिकांत शिंदे यांनी आमदार निलेश लंके यांना सोबत पुन्हा जलपूजन केले. त्यामुळे एकाच कामाचे एकाच दिवशी दोनदा उद्घाटन झाल्याने राष्ट्रवादी आणि शिवसेना आमदारांच्या श्रेयवाद निर्माण झाल्याचे समोर आले आहे.

जिहे-कटापूर या महत्वाकांक्षी योजनेचे नेर येथे आज भल्या पहाटे शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी जलपूजन केले तर याच कामाचे राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार शशिकांत शिंदे यांनी आमदार निलेश लंके यांना सोबत पुन्हा जलपूजन केले. एकाच कामाचे एकाच दिवशी दोन उदघाटन केल्याने 26 वर्षांपासून रखडलेल्या या कामासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना आमदारांच्या श्रेयवाद निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

माझ्याकडे शासनाच्या जलसंपदा विभागाचे पत्र आहे.केंद्रीय जल आयोगाकडे हा प्रस्ताव गेला त्याची मंजुरी 2021 साली मिळाली याचे पत्र आहे. केंद्रातून एकही रुपया आलेला नाही.केंद्राकडून 850 कोटी आणले असे दाखवतात हा समज आहे मात्र आतापर्यंत 632 कोटी रुपये खर्च झाले आहेत.काही लोकांना दुर्दैवाने सत्ता मिळाली आणि तीच कामे पूर्ण झाली त्याचे श्रेय घेण्याचे प्रयत्न चालू असल्याचे सांगत आमदार महेश शिंदे यांच नाव न घेता टीका केली आहे.

या कामाचे श्रेय महाविकास आघाडीचे आहे.पब्लिक सब जाणती है.. मात्र उदघाटन हे शरद पवार साहेबांच्या हस्तेच होणार असल्याचे सांगत या कामाचे उदघाटन राष्ट्रवादीच करणार असे आमदार शशिकांत शिंदे यांनी जलपूजनावेळी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com