NCP : सुनील तटकरेंचा शिवसेनेला दे धक्का; म्हसळा तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी राष्ट्रवादीत
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(NCP) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच तयारीला लागले आहेत. अनेक पक्षप्रवेश देखील होताना पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता सुनील तटकरेंनी शिवसेनेला दे धक्का दिल्याचे पाहायला मिळत आहे.
म्हसळा तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला आहे. काही दिवसांपूर्वीच म्हसळा नगर पंचायत मधील राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षांसह नगरसेवकांचा शिवसेनेत पक्षप्रवेश घेत मंत्री भरत गोगावले यांनी सुनील तटकरे यांना डिवचले होते.
या पक्षप्रवेशाला जोरदार प्रत्युत्तर देत सुनील तटकरे यांनी म्हसळा तालुक्यातील शिवसेनेच्या पूर्ण कार्यकारिणीचा पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात करवून घेत रायगड जिल्ह्यातील शिवसेनेला व मंत्री भरत गोगावले यांना धक्का दिल्याचे पाहायला मिळत आहे.
Summery
सुनील तटकरेंचा शिवसेनेला दे धक्का
म्हसळा तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी राष्ट्रवादीत
गद्दारांना आता माफी नाही, सुनील तटकरेंचा इशारा
