Kalyan-Dombivli Municipal Election
SHIV SENA SCORES UNOPPOSED WINS IN KDMC ELECTIONS FROM WARD 24

KDMC: कल्याण डोंबिवलीत शिवसेनेचे ३ नगरसेवक उमेदवार बिनविरोध विजयी

Kalyan-Dombivli Municipal Election: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक २४ मधून शिवसेनेचे तीन नगरसेवक बिनविरोध विजयी झाले.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक २४ मधून शिवसेनेचे तीन नगरसेवक बिनविरोध विजयी झाले आहेत. रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे आणि वृषाली जोशी हे उमेदवार निवडून आले असून, याच प्रभागातून भारतीय जनता पक्षाच्या ज्योती पाटील यांचीही बिनविरोध विजय मिळाला आहे. प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतल्याने हा तिहेरी विजय झाला असून, यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेनेने आपले खाते उघडले आहे.

Kalyan-Dombivli Municipal Election
Raj Thcakeray: 'मुंबई मराठी माणसाची,आपल्याकडे शेवटची संधी', राज ठाकरेंचं उमेदवारांना आवाहन

या विजयाने स्थानिक राजकारणात शिवसेनेचे स्थान अधिक भक्कम झाले आहे. हा विजय पक्षाच्या संघटनात्मक ताकदीचा आणि स्थानिक जनतेच्या विश्वासाचा परिणाम असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या तिन्ही नगरसेवकांचे अभिनंदन केले असून, पक्षातील उत्साह वाढला आहे.

Kalyan-Dombivli Municipal Election
Thackeray Sena: पुण्याच्या कसबा पेठेत ठाकरेसेनेच्या नाराज कार्यकर्त्यांनी फाडले पोस्टर

दरम्यान, कल्याण-डोंबिवली महापालिकेत महायुतीचा शतप्रतिशत महापौर बसणार असल्याचे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. येत्या दोन दिवसांत इतर प्रभागांतही शिवसेनेचे काही उमेदवार बिनविरोध निवडून येतील, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. या निवडणुकीत महायुतीला जबरदस्त पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.

Summary
  • प्रभाग २४ मधून शिवसेनेचे तीन उमेदवार बिनविरोध विजयी

  • प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतल्याने विजय निश्चित

  • एकनाथ शिंदे व डॉ. श्रीकांत शिंदेंकडून अभिनंदन

  • केडीएमसीमध्ये महायुतीचा महापौर बसण्याची शक्यता वाढली

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com