Shivsena
महाराष्ट्र
Shivsena : वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर शिवसेनेकडून हुंडाविरोधी हेल्पलाईनची घोषणा होणार
शिवसेनेकडून विशेष हेल्पलाइन क्रमांक जाहीर केला जाणार आहे.
( Shivsena ) पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असताना आता शिवसेना कडून हुंडा विरोधात नवा पवित्रा घेतला गेला आहे. हुंडा मागणाऱ्यांना चाप देण्यासाठी आता शिवसेनेकडून विशेष हेल्पलाइन क्रमांक जाहीर केला जाणार आहे.
या उपक्रमाअंतर्गत हुंड्याची तक्रार करणाऱ्या महिलांचे नाव पूर्णतः गोपनीय ठेवले जाईल. दरम्यान, यापूर्वीही मुंबई आणि पुणे शहरांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हुंडा विरोधात बॅनरबाजी केली होती. "हुंडा घेणारा कळवा, ५ हजार रुपये मिळवा!" अशा प्रकारच्या बॅनरमुळे समाजात चांगलीच चर्चा रंगली होती.
या पद्धतीने समाजात हुंडा देणे आणि घेणे याविरोधात जनजागृती घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.