ओबीसी समाजाच्या पाठीशी शिवसेना खंबीर उभी राहणार – एकनाथ शिंदे
अनिल घोडविंदे, (शहापूर)
शहापूर नगरपंचायत निवडणूक 2021-22 ची 13 जागांसाठी निवडणूक पार पडली आता ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 6,7,10 आणि 16 या 4 जागांसाठी 18 जानेवारीला निवडणूक होणार आहे,
या ठिकाणी भाजपा व शिवसेना यांची काटेकी टक्कर होणार असून आरोप-प्रत्यारोपाने ऐन थंडीत वातावरण गरम झाले आहे, या शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्हाचे पालकमंत्री शहापुरात आले होते यावेळी ते म्हणाले की शहापुरचा विकास नगरविकास खात्याने केला 63 कोटींचा भरगोस निधी दिला मग काही लोकप्रतिनिधी म्हणतात विकास आम्ही केला त्यांनी दिल्ली मधून निधी आणला का असं नाव न घेता केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना त्यांनी टोला मारला
तसेच मुरबाडचे आमदार किसन कथोरे शहापुरच्या विकास कामांच श्रेय घेण्यासाठी केविलवाणा प्रयत्न करतात पण त्यांना विकास निधी नगरविकास खातं देतंय त्याचा मंत्री मी आहे भाजपाच वागणं खोटं बोल पण रेटून बोल असं आहे, तसेच ओबीसीं समाजाच्या पाठीशी शिवसेना खंबीर पणे उभी आहे.