राणेंविरोधात शिवसेनेचं आक्रमक आंदोलन; कार्यकर्ते- पोलीस आमनेसामने

राणेंविरोधात शिवसेनेचं आक्रमक आंदोलन; कार्यकर्ते- पोलीस आमनेसामने

Published by :
Published on

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शिवसैनिक चांगलेच संतप्त व आक्रमक झाले आहेत. तसेच, मुंबईतील जुहू येथे राणे समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये मोठा राडा झाला आहे. यावेळी राणेंविरोधात शिवसेनेचं आक्रमक आंदोलन; कार्यकर्ते- पोलीस आमनेसामने आले आहेत.

दरम्यान, शिवसेनेच्या प्रत्येक विभागात राणे यांच्या वक्तव्याचा समाचार घेण्यासाठी शिवसेनेतर्फे आज दुपारी आंदोलन छेडण्यात आले. तसे आदेश शिवसेनेच्या सर्व विभागप्रमुखांना पक्ष श्रेष्टींकडून देण्यात आले आहे. विभाग क्रमांक 1 तर्फे विभागप्रमुख व आमदार विलास पोतनीस बोरिवली पूर्व ओंकारेश्वर मंदिरा समोर आंदोलन करणार आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा जुहू तारा रोडवर अतिश बंगला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com