Pune Election : महायुतीत फोडाफोडी सुरुच; भोरमधील शिंदेंचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार राष्ट्रवादीत
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Pune Election ) महाराष्ट्रातील आगामी निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. बैठकांचे आयोजन, अनेक पक्षप्रवेश होताना पाहायला मिळत आहे. यातच काल शिवसेनेमधून अनेक जणांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आता महायुतीत फोडाफोडी सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे.
यातच आता भोर नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून अर्ज दाखल करणारे नितीन सोनवले यांनी अचानक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामुळे आता राजकीय वर्तुळात अनके चर्चांना वेग आला आहे. राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकर यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला.
सोनवले आता शिवसेनेकडून भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेणार असून आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीसाठी सक्रिय भूमिका बजावणार आहेत. त्यामुळे शिवसेनेचा प्रमुख उमेदवार हातातून गेल्याने पक्षाची भोरमधील समीकरणे पूर्णपणे ढवळून निघाल्याचे पाहायला मिळत आहे.
Summery
महायुतीत फोडाफोडी सुरुच
भोरमधील शिंदेंचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार राष्ट्रवादीत
नितीन सोनवलेंचा अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश
