महाराष्ट्र
किल्ले रायगडावर बुधवारी तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा , परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप …
किल्ले रायगडावर बुधवारी (23 जून ) शिवराज्याभिषेक दिनोत्सव समितीतर्फे तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा होत आहे. या पार्शवभूमीवर पोलिसांनी रायगडची नाकाबंदी केली आहे. रायगडच्या पायथ्याशी असलेल्या पाचाडपासून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. शीघ्र कृतीदल पथकही सज्ज ठेवण्यात आलंय. कोरोनामुळे केवळ 20 लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा करण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे. त्यातच सोहळा साजरा करण्यावरून दोन संस्थांमध्ये वाद झाला होता. हा वाद बैठकीत मिटला असला तरी पोलिसांनी पूर्ण खबरदारी घेतली आहे. पाचाड इथं बॅरिगेटिंग करण्यात आलंय. चौकशी करूनच वाहने किंवा नागरिकांना पुढं सोडलं जात आहे.