महाराष्ट्र
Neela Desai Passes Away : शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार नीला देसाई यांचे निधन
शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार नीला देसाई यांचे निधन झालं आहे.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Neela Desai Passes Away) शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार नीला देसाई यांचे निधन झालं आहे. हृदयविकाराच्या झटक्याने नीला देसाई यांचे निधन झालं असून त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात नेण्यात आले होते मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.
त्या विधान परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आलेल्या आणि शिवसेनेच्या महिला पहिल्या आमदार होत्या. नीला देसाई यांच्या पार्थिवावर आज दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या घटनेने राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.
Summary
माजी आमदार नीला देसाई यांचे निधन
शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार होत्या
हृदयविकाराच्या झटक्याने निधन
