”मंत्र्यांनी आपआपली खाती व्यवस्थित चालवावी”; सेना आमदाराचा सरकारला घरचा आहेर

”मंत्र्यांनी आपआपली खाती व्यवस्थित चालवावी”; सेना आमदाराचा सरकारला घरचा आहेर

Published by :

मंगेश जोशी | जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर शिवसेनेचे आमदार चंद्रकांत यांनी ओझरखेडा तलावात आज जलसमाधी आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान "ज्या मंत्र्यांना जे खाते दिले आहे त्यांचे खाते मंत्र्यांनी व्यवस्थित चालवले पाहिजे", असे विधान करत शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी ओझरखेडा तलावात शिवसैनिकांसह आज ओझरखेडा तलावात जलसमाधी आंदोलन केले. जळगाव जिल्ह्यातील ओझरखेडा साठवण तलावात तापी नदीतून पाणी सोडण्यात यावे या मागणीसाठी हे आंदोलन केले. प्रशासनाने आश्वासन देऊनही दखल घेतल्याने अखेर जलसमाधी आंदोलन केले असल्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

मुख्यमंत्री राज्याचा गाडा हाकत असताना मात्र ज्या मंत्र्यांना जे खाते दिले आहेत त्या मंत्र्यांनी आपले खाते व्यवस्थित चालवावे अशी प्रतिक्रिया देत आमदार चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारलाचं घरचा आहेर दिला आहे. तसेच कोरोनामुळे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत देखील आमदार पाटील यांनी व्यक्त केली.

दरम्यान राज्यात सत्ता महाविकास आघाडीची असताना त्यांच्याच पक्षातील आमदारांना आंदोलन करण्याची वेळ आली आहे. तसेच शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलेले जलसमाधी आंदोलन म्हणजे एकप्रकारे सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर असल्याचे बोलले जाते. तसेच सत्ताधारी आमदारांच्या आंदोलनाने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. प्रशासन राज्यकर्त्यांच्या कामाकडे दुर्लक्ष करते आहे का ? राज्याच्या मंत्र्यांचे देखील प्रशासनाचे अधिकारी ऐकत नाही का ? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com