Washim bus accident
Washim bus accidentteam lokshahi

शिवशाही बसचा टायर निखळल्याची धक्कादायक घटना, 3 चाकावर बस धावल्याने प्रवाश्यांचा जीव टांगणीला...

भंगार गाड्या चालवणे कधी बंद करणार असा संतप्त सवाल प्रवाशांमधून उपस्थित केला जात आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

गोपाल व्यास|वाशिम: वाशिमच्या लोणी जवळ रिसोड - संभाजीनगर शिवशाही बसचा अचानक टायर निखळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 3 चाकावर बस धावल्याने बस मध्ये बसलेल्या प्रवाशांचा जीव टांगणीला लागलेला पाहायला मिळाला आहे. यावेळी भंगार गाड्या चालवणे कधी बंद करणार असा संतप्त सवाल प्रवाशांमधून उपस्थित केला जात आहे.

चालत्या बसचा टायर निखळल्याने बसमध्ये बसलेल्या प्रवाशांमध्ये एकच खळबळ माजली आहे. चालकाच्या प्रसंगावधनामुळे 50 प्रवाशांचे प्राण वाचले असे म्हणण्याची वेळ आली आहे.

सध्या बहुतांश बसेस भंगार अवस्थेत आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्वरित लक्ष देऊन भंगार बसेस बंद करून नवीन बसेस प्रवाशांच्या सोयीसाठी उपलब्ध करण्याची मागणी यावेळी प्रवासी करीत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com