महाराष्ट्र
दिवाळीची ऑनलाइन खरेदी करतायं? थांबा आधी ही बातमी वाचाच
दिवाळीच्या मुहूर्तावर बरेचजण दिवाळीची खरेदी करण्याचा विचार करत असतील. अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर अनेक कंपन्या सध्या असंख्य धमाकेदार ऑफर देत आहेत.
सुरेश वायभट | पैठण : दिवाळीच्या मुहूर्तावर बरेचजण दिवाळीची खरेदी करण्याचा विचार करत असतील. अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर अनेक कंपन्या सध्या असंख्य धमाकेदार ऑफर देत आहेत. मात्र, ऑनलाइन खरेदी करताना बऱ्याचदा फसवणूक होण्याचा धोकादेखील असतो. अशा ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन पैठण पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक संजय देशमुख यांनी केले आहे.
ऑनलाइन खरेदी करत असतांना अनेकांची फसवणूक होते असते. ही फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी स्थानिक बाजारपेठेत खरेदी करुन आपल्या स्थानिक बाजारपेठेला बळकट करावे, असे आवाहन व्यापारी महासंघाचे पवन लोहिया यांनी केले आहे.