Shrikant Shinde : "काँग्रेसच्या मतांवरती आतापर्यंत निवडून आले"; ठाकरे सेनेवर श्रीकांत शिंदेंची जोरदार टीका
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Shrikant Shinde) महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. अनेक बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे. राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. यातच आता श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे सेनेवर जोरदार टीका केली आहे.
श्रीकांत शिंदे म्हणाले की, "काँग्रेसच्या मतांवरती आतापर्यंत उबाठा निवडून आली. आमदारकी असेल किंवा खासदारकी असेल जे काही मतदान मिळत होते ते काँग्रेसचं होते. पण काँग्रेसला त्यांचा फायदा होत नव्हता. "
"आज काँग्रेसनं ते जाणून घेतलं की आमच्यामुळे हे लोक निवडून येतात. आज काँग्रेसनं चांगला निर्णय घेतलेला आहे. त्यांना शुभेच्छा." असे श्रीकांत शिंदे म्हणाले.
Summery
'ठाकरे सेनेचा फायदा होत नसल्याने काँग्रेसने साथ सोडली'
'काँग्रेसच्या मतांवर ठाकरेसेना निवडून येत होती'
श्रीकांत शिंदेंची ठाकरे सेनेवर टीका
