Local body elections : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडण्याची चिन्हे; उद्या ‘सुप्रीम’ कोर्टात सुनावणी
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Local body Elections) आगामी निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच आता जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर उद्या सुप्रीम कोर्टात याबाबत सुनावणी पार पडणार आहे.
राज्यातील 44 नगरपालिका, 11 नगरपंचायती, 20 जिल्हा परिषदा आणि नागपूर, चंद्रपूर या दोन महापालिकांमध्ये 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्याचा राज्य सरकारचा अहवाल आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 31 जानेवारी 2026 पर्यंत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
याच पार्श्वभूमीवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार असून या सुनावणीत काय निर्णय होणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. 20 जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याची माहिती मिळत असून नागपूर, चंद्रपूर या 2 पालिकांमध्येही आरक्षण मर्यादा ओलांडण्यात आली आहे.
Summery
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडण्याची चिन्हे
20 जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडली
उद्या ‘सुप्रीम’ कोर्टात सुनावणी
