Silk Farming|Beed
Silk Farming|Beed team lokshahi

Silk Farming|बीडमध्ये सातशे एकरमध्ये रेशीम शेती; आर्थिक उलाढाल कोटींच्या घरात

गावाचा आर्थिक गाडा रूळावर
Published by :
Team Lokshahi

दुष्काळग्रस्त म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्यातील शेतकरी आता आधुनिक शेतीची कास धरू लागलाय असं दिसतय. गेवराई तालुक्यातील रुई या गावात सातशे एकरवर तुतीची लागवड करण्यात आली आहे. इथल्या शेतकऱ्यांनी रेशीम शेतीतून (Agriculture) आधुनिक क्रांती घडवत आपल्या गावाचा आर्थिक (Economics) गाडा रूळावर आणला आहे. इतर गावांपुढे रुई हे गाव सध्या आदर्श ठरताना दिसत आहे. (Silk became the new identity of Beed district of Maharashtra, farmers are earning well)

Silk Farming|Beed
तळीरामांसाठी अजित पवारांची महत्वपूर्ण घोषणा, राज्यात आजपासून...

गेवराई (Gevrai) तालुक्यातील रुई या गावात इतर गावांप्रमाणे पारंपरिक शेती केली जात होती. मात्र अलीकडच्या काळात या गावातील शेतकऱ्यांनी आधुनिक शेती म्हणून रेशीम शेतीकडे (silk farming) आपला मोर्चा वळवला, आणि इथूनच क्रांती घडली. सध्या या गावांमध्ये तब्बल सातशे एकरवर रेशीम शेती बहरत आहे. त्यामुळे गावात आर्थिक उलाढाल देखील मोठी झाली आहे. आणि गावातील रोजगार देखील वाढत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com