सिंधुदुर्ग बँकेच्या निकालास सुरुवात;संतोष परब हल्लाप्रकरणातील संशयित असलेला मनिष दळवी विजयी
Sindhudurg District Central Co-operative Bank Election: सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची काल निवडणूक पार पडली. निवडणुकीत केंद्रीयमंत्री नारायण राणे (Narayan Rane) पॅनल आणि महाविकास आघाडीत मोठी चुरस पाहायला मिळाली. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीची आज मतमोजणी पार पडत आहे. संतोष परब हल्ला प्रकरणातील संशयित आणि भाजपचे उमेदवार मनिष दळवी या निवडणुकीत विजयी झाले आहेत. पहिलाच निकाल भाजपच्या बाजूने लागल्यानंतर या निवडणुकीच्या सर्वच्या सर्व निकालांबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
महाविकास आघाडीचे दुसरे उमेदवार सतीश सावंत आणि भाजपचे उमेदवार विठ्ठल देसाई यांना समसमान मते मिळाली आहेत. त्यानंतर चिठ्ठी काढण्यात आली. त्यात सतीश सावंत पराभूत झाले आहेत.त्यांच्या पराभवामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. राणे समर्थकांनी फटाके फोडून विजयाचा जल्लोष सुरू केला आहे.