KK
KKteam lokshahi

Singer KK Death Reason : ओठांवर, चेहऱ्यावर जखमा.... KK यांच्या मृत्यूचं गूढ वाढलं

Published by :
Shweta Chavan-Zagade

प्रसिद्ध गायक केके यांचे कृष्णकुमार कुन्नथ (KK aka Krishnakumar Kunnath) यांच्या निधनाने मोठा धक्का बसला आहे.परफॉर्मन्सदरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांना तातडीने सीएमआरआय रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. के के 53 वर्षांचे होते.

आतापर्यंत मृत्यूचं खरं कारण समोर आलेलं नाही, मात्र प्राथमिक माहितीनुसार केके यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं सांगण्यात येत आहे. कोलकात्यात एका कॉन्सर्टदरम्यान केके लाइव्ह परफॉर्म करत असताना त्यांना पक्षाघाताचा झटका आला. यानंतर केके यांना तातडीने कोलकाता मेडिकल रिसर्च इंस्टिट्यूटमध्ये नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी केके यांना मृत घोषित केले.

KK
Video: ‘हम रहें या न रहें कल…’ ठरलं ‘केके’चं शेवटचं गाणं

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केकेच्या चेहऱ्याला आणि डोक्याला जखमा झाल्या होत्या. कोलकत्तामधल्या एसएसकेएम रुग्णालयात ऑटोप्सी करण्यात येणार आहे. यानंतर हॉटेल स्टाफ आणि कार्यक्रम व्यवस्थापनाचीही चौकशी केली जाईल, असं पोलिसांनी सांगितलं.

केके याने ए.आर. रेहमानचं (A.R.Rehman) सुपरहिट गाणं कल्लुरी साले आणि हॅलो डॉक्टर याच्या माध्यमातून आपल्या करियरची सुरुवात केली. बॉलिवूडमध्ये गुलझार यांच्या माचिस या चित्रपटातल्या 'छोड आये हम' या गाण्यातला छोटा भाग गाऊन प्रवेश केला. १९९९ सालच्या 'हम दिल दे चुके सनम' (Hum dil de chuke sanam) या चित्रपटातल्या 'तडप तडप के' या गाण्यानंतर त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली.

KK
Singer KK Death : सुप्रसिद्ध गायक केके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com