अंबरनाथमध्ये दुचाकीमध्ये शिरलेला साप रेस्क्यू
मयुरेश जाधव । अंबरनाथमध्ये एका दुचाकीमध्ये आश्रय घेतलेल्या सापाची सर्पमित्राने सुटका केली आहे. मात्र या सापाला बाहेर काढण्यासाठी सर्पमित्राला मोठी कसरत करावी लागली, तब्बल दीड ते दोन तास अथक केलेल्या प्रयत्नानंतर त्याला यशस्वी बाहेर काढण्यात आले.
अंबरनाथ मधील शिवगंगा परिसरातील निलगंगा इमारतीच्या आवारात धामण जातीचा साप शिरला होता. या सापाला पकडण्यासाठी या इमारतीतील रहिवाशांनी सर्प मित्र प्रकाश गोहिल यांना पाचारण केले होते. प्रकाश गोहिल यांनी या सापाला पकडण्याचा प्रयत्न केला असता हा साप इमारतीच्या आवारात उभ्या असलेल्या एका दुचाकी मध्ये शिरला. दुचाकीमध्ये आश्रय घेतलेल्या सापाला काढण्यासाठी एका दुचाकी दुरुस्त करणाऱ्या मेकॅनिकला बोलवावं लागलं. अखेर या मेकॅनिकला या गाडीचे एक एक पार्ट खोलावे लागले त्यानतर सापाला पकडण्यात यश आलं. तब्बल दीड ते दोन तास चाललेल्या कसरतीनंतर सापाला यशस्वीरीत्या बाहेर काढण्यात आले.