OBC Reservation | …तर मी राजीनामा देतो; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान
राज्यात ओबीसी आरक्षणाचा प्रश्न अजूनही सुटेलला नाही आहे. त्यातच भाजपने राज्यभरात उद्यापासून आंदोलनाचा इशारा दिला आहे. या सर्व घडामोडीत आता राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राजीनामा देण्याचे विधान केले आहे.
संपूर्ण देशातलं ओबीसी आरक्षण सध्या धोक्यात आलेलं आहे. अशा परिस्थितीत आमचं डेटा एकत्र करण्याचं काम आम्ही करुच. मात्र आम्हाला अध्यादेश काढून या निवडणुका पुढे ढकलता येतात का याचा विचार आम्ही करु. काहीही मार्ग सापडला नाही तर सर्वच पक्षांनी निवडणुकांना ओबीसी उमेदवार उभे करावेत,असे मत विजय वडेट्टीवार यांनी मांडले.तसेच सर्व पक्षांचं एकमत घेऊनच निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय सर्व पक्षांच्या संमतीने घेतला जाईल असंही त्यांनी अधोरेखित केले.
आजच्या या परिस्थितीला महाविकास आघाडी किंवा काँग्रेस नाही तर भाजपा जबाबदार आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. त्याचबरोबर माझ्या राजीनाम्याने जर हा प्रश्न सुटणार असेल तर मी राजीनामा द्यायला तयार आहे असंही ते म्हणाले आहे.