महाराष्ट्र
सोलापुरात भाजपाचे भजन आंदोलन, मंदिरे खुली करण्याची मागणी
राज्यातील सर्व मंदिरे खुली करावी या मागणीसाठी सोलापुरात भाजपने भजन आंदोलन केले. सोलापूरचे ग्रामदैवत असलेल्या मल्लिकार्जुन मंदिरासमोर भजन आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख आणि महापौर श्री कांचना यन्नम यांनी केले.
हिंदुत्वापासून दूर जाण्याचा भूमिकेतून शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसशी युती केली आहे, त्यामुळे ठाकरे सरकारने मंदिर बंद ठेवल्याचा आरोप माजी सहकारमंत्री आमदार सुभाष देशमुख यांनी केला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाला पोलिसांकडून परवानगी देण्यात आली नाही. तरीही आंदोलन केल्याने पोलिसांनी आमदार पुत्र नगरसेवक किरण देशमुख यांच्यासह आंदोलनकर्त्यांना अटक केली. अटक केलेल्या आंदोलन कार्यकर्त्यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.

