धक्कादायक! पोटच्या मुलानेच बापाच्या अंगावर ट्रॅक्टर घालून केला खून

धक्कादायक! पोटच्या मुलानेच बापाच्या अंगावर ट्रॅक्टर घालून केला खून

सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील बेडग येथील घटना

संजय देसाई | सांगली : मिरज तालुक्यातील बेडग येथून धक्कादायक घटना घडली आहे. पोटच्या मुलानेच बापचा खून केल्याचे समोर येत आहे. उसने दिलेले पैसे परत मागण्यासाठी गेलेल्या बापाच्या अंगावर मुलाने ट्रॅक्टर घालून खून केला आहे. या घटनेनंतर मुलगा फरार झाला आहे.

दाजी उर्फ दादू गणपती आकळे उर्फ उप्पार (वय 55) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर, लक्ष्मण दादू उर्फ दाजी आकळे (वय 31) असे मुलाचे नाव आहे.

धक्कादायक! पोटच्या मुलानेच बापाच्या अंगावर ट्रॅक्टर घालून केला खून
मोठी बातमी! आशिष देशमुखांची काँग्रेसमधून हकालपट्टी

सांगली जिल्ह्यातील बेडग स्टेशन रोड मलगाव या ठिकाणी ही आज घटना घडली आहे. लक्ष्मण आकळे यांनी वडिलांकडून 80 हजार रुपये उसने घेतले होते. हे पैसे आज वडील दादू आकडे मुलाकडे मागण्यासाठी गेले होते. यावेळी वडील आणि मुलामध्ये मोठा वाद झाला आहे. याच वादातून मुलाने वडिलांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून खून केला आहे. ही घटना समजल्यानंतर मिरज ग्रामीण पोलीस निरीक्षक नारायण देशमुख घटनास्थळावर दाखल झाले होते. परंतु, तोपर्यंत आरोपी लक्ष्मण आकळे हा घटनास्थळावरून पळून जाण्याच्या यशस्वी झाला आहे. मिरज ग्रामीण पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com