काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी सोनिया गांधी साधणार संवाद

काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी सोनिया गांधी साधणार संवाद

Published by :
Published on

केंद्र सरकारच्या रणनीतीविरोधात आवाज उठवण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी येत्या २० ऑगस्टला काँग्रेसशासित राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा सहभागी होतील अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

सोनिया गांधी विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून त्यांच्याकडून कोरोना परिस्थितीची माहिती घेणार आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांना येणाऱ्या अडचणीही त्या जाणून घेणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com