Gaja Marne
Gaja Marne

Gaja Marne : गजा मारणेला पुणे शहरात प्रवेशबंदी कायम; पत्नीच्या प्रचारासाठी शहरात प्रवेश देण्याची मागणी विशेष न्यायालयाने फेटाळली

कुख्यात गुंड गजा मारणेची पत्नी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे पाहायला मिळत आहे
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Gaja Marne) कुख्यात गुंड गजा मारणेची पत्नी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याची पत्नी जयश्री मारणेला अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून प्रभाग 10 बावधनमधून उमेदवारी देण्यात आली आहे.

जयश्री मारणे या अजित पवार गटाच्या अधिकृत उमेदवार असून अजित पवारांनी गुंड गजा मारणेच्या पत्नीला उमेदवारी दिल्याने आता राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत. यातच आता महापालिकेच्या निवडणूक लढवणाऱ्या पत्नीच्या प्रचारासाठी शहरात प्रवेश देण्याची गजानन मारणेने न्यायालयाला विनंती केली होती.

पत्नीच्या प्रचारासाठी शहरात प्रवेश देण्याची मागणी विशेष न्यायालयाने फेटाळली असून गजा मारणेला पुणे शहरात प्रवेशबंदी कायम असणार आहे.

Summary

  • गुंड गजा मारणेला पुणे शहरात प्रवेशबंदी कायम

  • विशेष न्यायालयाने फेटाळली विनंती

  • पत्नीच्या प्रचारासाठी शहरात प्रवेश देण्याची मागणी फेटाळली

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com