दहावी-बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; 'या' तारखेपासून होणार सुरु

दहावी-बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; 'या' तारखेपासून होणार सुरु

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. महाराष्ट्र बोर्डाची दहावीची परीक्षा 1 मार्च ते 26 मार्चदरम्यान घण्यात येणार आहे. तर बारावीची बोर्डाची 21 फेब्रुवारी ते 19 मार्चदरम्यान होणार आहे.

दहावी-बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; 'या' तारखेपासून होणार सुरु
मराठा आरक्षणाप्रश्नी दोन दिवसीय विशेष अधिवेशन घ्यावे; आठवलेंची मागणी, जरांगेंना केली 'ही' विनंती

दहावी आणि बारावीच्या सविस्तर वेळापत्रक 2 नोव्हेंबर रोजी मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. लेखी पुरवणी परीक्षा पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणार आहे. मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाकडे छापील स्वरूपात देण्यात येणारं वेळापत्रक अंतिम असेल, असं महाराष्ट्र बोर्डाने जाहीर केलं आहे.

छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ठ व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सअॅप किंवा तत्सम माध्यमातून प्रसिध्द झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे आवाहन मंडळाने केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com