दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर

दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर

Published by :

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाकडून (MSBHSE) दहावी बारावीचं सविस्तर वेळापत्रक (SSC HSC Exam Time Table) काल जाहीर केलं आहे. मंडळानं विद्यार्थ्यांच्या प्राथमिक माहितीसाठी वेळापत्रक वेबसाईटवर उपलब्ध करुन दिलेलं आहे. याशिवाय वेळापत्रक शाळांना पाठवलं जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी यासंदर्भात माहिती दिली. त्यानुसार बारावीची परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल या कालावधीत पार पडेल. तर दहावीची परीक्षा १५ मार्च ते १८ एप्रिल या कालावधीत पार पडेल. याशिवाय, बारावीच्या प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत पार पडतील. तर दहावीच्या प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा २५ फेब्रुवारी ते १४ मार्च या कालावधीत पार पडतील.

दहावी बोर्ड परीक्षा वेळापत्रक

15 मार्च – मराठी, हिंदी उर्दू ,गुजराती व इतर प्रथम भाषा
19 मार्च – इंग्रजी
21 मार्च – हिंदी
24 मार्च – गणित भाग – १
26 मार्च – गणित भाग २
28 मार्च – विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १
30 मार्च – विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग २
1 एप्रिल – सामाजिक शास्त्र पेपर १
4 एप्रिल – सामाजिक शास्त्र पेपर २

बारावी बोर्ड परीक्षा वेळापत्रक

4 मार्च – इंग्रजी
5 मार्च – हिंदी
7 मार्च – मराठी
8 मार्च – संस्कृत
9 मार्च – वाणिज्य संघटन व व्यवस्थापन
10 मार्च – भौतिकशास्त्र, तर्कशास्त्र
12 मार्च – रसायनशास्त्र
14 मार्च – गणित आणि संख्याशास्त्र
17 मार्च – जीवशास्त्र, भारतीय संगीताचा इतिहास व विकास
19 मार्च – भूशास्त्र, अर्थशास्त्र
21 मार्च – वस्त्रशास्त्र, पुस्तपालन आणि लेखाकर्म

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com