ST Corporation : एसटी महामंडळाची नवी दिशा: एसटी महामंडळ प्रवासी वाहतुकीसोबत पेट्रोल पंप आणि चार्जिंग स्टेशन उभारणार
थोडक्यात
प्रवासी वाहतुकीसोबतच एसटी महामंडळ उभारणार पेट्रोल पंप, चार्जिंग स्टेशन
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी हा निर्णय जाहीर केला
या निर्णयामुळे एसटी महामंडळाला आर्थिक बळ मिळणार
(ST Corporation) एसटी महामंडळ आता लवकरच प्रवासी वाहतुकीसोबत पेट्रोल पंप आणि चार्जिंग स्टेशन उभारणार असल्याची माहिती मिळत आहे. महामंडळाच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी हा निर्णय जाहीर केला आहे.
सध्या 251 ठिकाणी एसटीच्या स्वतःच्या जागेवर पंप आहेत. याच पार्श्वभूमीवर आता एसटी महामंडळ लवकरच 250 पेक्षा जास्त ठिकाणी व्यावसायिक तत्त्वावर पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक चार्जिंग पॉइंटसह किरकोळ विक्री केंद्र सुरू करणार आहे. त्याची निविदाप्रक्रिया सुरू झाली असून, ती दोन महिन्यांत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
फक्त प्रवासी तिकीट महसुलावर अवलंबून राहणे शक्य नाही. त्यामुळे नवे उत्पन्न स्त्रोत निर्माण करणे आवश्यक करणे गरजेचं असल्याचे बोलले जात आहे. या निर्णयामुळे एसटी महामंडळाला आर्थिक बळ मिळणार आहे.एसटी महामंडळ आता आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी नवीन पाऊले उचलत असल्याचे पाहायला मिळत आहे.
