एसटी कर्मचारी मागण्यांवर ठाम; अटक झाली तरी चालेल संप सुरूच राहणार

एसटी कर्मचारी मागण्यांवर ठाम; अटक झाली तरी चालेल संप सुरूच राहणार

Published by :
Published on

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर देखील एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. बीडमध्ये तीन तारखेपासून एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद पुकारून संपाचं हत्यार उपसले आहे. एसटी महामंडळाचे शासनात विलगीकरण करण्याच्या मागणीसाठी कर्मचारी आक्रमक असल्याचं पाहायला मिळतंय.

बीडच्या एसटी आगारात मुक्काम करून या कर्मचाऱ्यांनी काळी दिवाळी साजरी केली. अटक झाली तरी चालेल मात्र आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम आहोत. असा निर्णय पवित्रा बीड मधील एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. बडतर्फ करण्याच्या भीतीने बीड जिल्ह्यातील चार आगारातील बस सेवा सुरू होती. मात्र उद्या माजलगाव, धारूर, परळी आणि अंबाजोगाई आगार देखील बंद ठेवण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com