ST Worker Strike | कामावर हजर व्हा,  अन्यथा…,- अनिल परब

ST Worker Strike | कामावर हजर व्हा, अन्यथा…,- अनिल परब

Published by :

राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीबाबत निर्णय घेतल्यानंतर मागील काही दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन संपुष्टात येईल असं वाटत होतं. मात्र एसटी आंदोलक संप मागे घ्यायला तयार नाहीत. आझाद मैदानावरील एसटी आंदोलक कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. याचपार्श्वभूमीवर एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी माध्यमांशी संवाद साधला असता, एसटी कर्मचाऱ्यांनी उद्यापर्यंत कामावर हजर व्हावे, नाही तर कारवाईला सामोरे जावे लागेल असे आव्हान यावेळी परब यांनी कर्मचार्यांना केले आहे.

एसटी प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना दोन दिवसांचे अल्टीमेटम देण्यात आलं आहे. आज आणि उद्या दोन दिवसांत कामावर रुजू व्हा, नाहीतर परवापासून निलंबीत कर्मचाऱ्यांवर कायमस्वरुपी बडतर्फीची कारवाई होणार असल्याचं सांगितलं आहे.  जे कर्मचारी निलंबित झालेत ते कामावर रुजू झाल्यास निलंबन मागे  मात्र, परवापासून कामावर रुजू न झालेल्या कर्मचाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल. निलंबित कर्मचाऱ्यांच्या जागी भरती प्रक्रियेतील वेटिंग लिस्टवरील कर्मचाऱ्यांची भरती करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. संपावर आहेत मात्र अद्याप निलंबन झालेले नाही अशा कर्मचाऱ्यांवरही परवापासून कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. 

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com