ST Workers Strike | एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाला भावनिकतेची जोड देत केली सामूहिक प्रार्थना

ST Workers Strike | एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाला भावनिकतेची जोड देत केली सामूहिक प्रार्थना

Published by :

एसटी कर्मचारी आपल्या मागण्या शासन स्तरावर पोहचविण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन करत आहेत. आज बीडच्या एसटी आगारातील विविध समाज बांधवांनी एकत्र येत आपलं गाऱ्हाणं मांडले आहे.

बीड आगारातील एसटी कर्मचारी मागील पंधरा दिवसांपासून आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहे. दररोज लक्षवेधी आंदोलन करत हे कर्मचारी शासन दरबारी आपलं म्हणणं पोचवण्याचा प्रयत्न करत आहे. आज मात्र आंदोलनाला भावनिकतेची जोड देत सामूहिक प्रार्थना करण्यात आलीय.

यामध्ये हिंदू बांधवांनी लक्ष्मी पूजन, भागवत गीता वाचन करून विधिवत पूजा केली. मुस्लिम बांधवांनी दुआ अदा केली, तर बौद्ध धर्मियांनी बुद्ध वंदना केली. सरकारने गांभीर्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा समजावून घेत विलीनीकरणाचा मार्ग मोकळा करावा, अन्यथा एकही कर्मचारी सेवेत रुजू होणार नाही. असं पुन्हा कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केलंय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com