State Cabinet meeting : आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आज घोषणा होणार?
थोडक्यात
आज दुपारी 1 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आज घोषणा होणार?
मंत्रिमंडळ बैठकीतून घेतला जाणार शेती नुकसानीचा आढावा
(State Cabinet meeting )आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीतून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आज काय घोषणा होणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. यंदा अतिवृष्टी झाल्याने प्रचंड नुकसान झाले आहे.
शेती आणि घरादारांचे नुकसान झाले आहे. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्या बुधवारी मुंबई दौरा असणार असून या दौऱ्यानिमित्ताने आजची बैठक महत्त्वाची मानली जात आहे. या बैठकीतून अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा नुकसानीचा आढावा घेतला जाणार असून आजच्या या बैठकीतून काही घोषणा होतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यंदा राज्य सरकारकडून गणेशोत्सवात आनंदाचा शिधा वितरित करण्यात आलेला नाही.आता दिवाळीतसुद्धा आनंदाचा शिधा मिळणार नसल्याची चर्चा आहे. यावर देखील या बैठकीत चर्चा होते का? हे बघणं महत्त्वाचे ठरणार आहे.