State Cabinet Meeting
State Cabinet Meeting

State Cabinet Meeting : राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक; दिल्ली स्फोटानंतर मुंबईतील सुरक्षेवर चर्चेची शक्यता

दिल्ली ब्लास्टनंतर मुंबईतील सुरक्षेवर चर्चेची शक्यता
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • आज राज्य मंत्रिमंडळ बैठक

  • दुपारी 12.00 वाजता होणार बैठक

  • दिल्ली ब्लास्टनंतर मुंबईतील सुरक्षेवर चर्चेची शक्यता

(State Cabinet Meeting) नवी दिल्लीमध्ये लाल किल्ला मेट्रो स्टेशन गेट क्रमांक 1 जवळ पार्किंगमध्ये स्फोट झाला. या स्फोटानंतर अनेक गाड्यांना आग लागली.या स्फोटात सुमारे 8 जणांचा मृत्यू झाला असून, 20 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. नवी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील मेट्रो गेट क्रमांक 1 जवळ पार्किंगमध्ये हा स्फोट झाला असून या घटनेनंतर आजूबाजूला असलेल्या वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे.

स्फोटानंतर परिसरात मोठी आग लागली. हा स्फोट नेमका कशामुळे झालाय? ते अद्याप समजू शकलेलं नाही. पोलिसांकडून याचा तपास सुरू आहे. या स्फोटानंतर संपूर्ण दिल्लीसह मुंबईतही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या घटनेनं अनेक ठिकाणी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. यातच आता राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे.

या बैठकीत दिल्ली ब्लास्टबद्दल चर्चा करण्यात येईल तसेच या स्फोटानंतर मुंबईच्या सुरक्षेवर देखील चर्चेची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय चर्चा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com