Uddhav Thackeray - Raj Thackeray
Uddhav Thackeray - Raj Thackeray

Uddhav Thackeray - Raj Thackeray : राज्य निवडणूक आयोगाकडून मनपा क्षेत्रात निवडणुका जाहीर पण ठाकरे बंधूंचं अद्यापही युतीच ठरेना

आगामी निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष आता तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Uddhav Thackeray - Raj Thackeray) आगामी निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष आता तयारीला लागले आहेत. महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं असून मुंबई, पुणेसह राज्यातील २९ महापालिका निवडणुकीची घोषणा करण्यात आली. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जांगासाठी ही निवडणूक होणार आहे.

23 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीमध्ये महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत, तर 31 डिसेंबर रोजी उमेदवारांच्या अर्जाची छाननी होणार आहे. तर 2 जानेवारी 2026 पर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येणार आहेत. 3 जानेवारी रोजी चिन्हाचं वाटप होणार असून 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे.

या पार्श्वभूमीवर आता मनसेप्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे या दोघांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर ठाकरे बंधूंची युती कधी जाहीर होणार, हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून मनपा क्षेत्रात निवडणुका जाहीर झाली मात्र ठाकरे बंधूंच अद्यापही युतीच ठरत नसल्याचे पाहायला मिळत असून युतीबाबत कधी घोषणा होणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार असून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

Summery

  • राज्य निवडणुक आयोगाकडून मनपा क्षेत्रात निवडणुका जाहीर

  • ठाकरे बंधूंच अद्यापही युतीच ठरेना

  • युतीबाबत कधी होणार घोषणा? चर्चेला उधाण

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com