महाराष्ट्र
Municipal Corporation Election : महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजणार? राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद
आगामी महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Municipal Corporation Election) आगामी महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच आज राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. दुपारी 4 वाजता ही पत्रकार परिषद होणार असून महापालिका निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत पत्रकार परिषद होणार आहे. सह्याद्री अतिथीगृहावर या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले असून या राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले असून महापालिका निवडणुकांची घोषणा होणार का? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
Summery
राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद
दुपारी 4 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर पत्रकार परिषद
महापालिका निवडणुका जाहीर होण्याची शक्यता
