Rashmi Shukla
Rashmi Shukla

Rashmi Shukla : राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आज निवृत्त; सदानंद दाते नवे पोलीस महासंचालक

राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आज निवृत्त होणार आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Rashmi Shukla) राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आज निवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागी नवीन पोलीस महासंचालक कोण असेल याची चर्चा गेल्या महिन्यापासून सुरू होती. राज्याच्या पोलीस महासंचालकपदी ज्येष्ठ पोलीस अधिकारी सदानंद दाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबईच्या नायगाव येथील पोलीस मैदानात हा कार्यक्रम पार पडला. २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील शौर्य गाजवणारे ज्येष्ठ आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली असून ते आजपासून पदभार स्विकारणार आहेत. सदानंद दाते राज्याचे 48वे पोलीस महासंचालक असून दाते यांना दोन वर्षांचा कार्यकाळ मिळणार आहे.

Summary

  • राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आज निवृत्त

  • मुंबईच्या नायगाव येथील पोलीस मैदानात कार्यक्रम

  • रश्मी शुक्लांच्या निवृत्तीचा कार्यक्रम संपन्न

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com