Buldhana
महाराष्ट्र
Buldhana : देवी विसर्जन रॅलीत दगडफेक; 5 ते 7 जण जखमी
दोन गटात राडा झाल्याने दगडफेकीची घटना
थोडक्यात
बुलढाण्याच्या बावनबीर देवी विसर्जन रॅलीत दगडफेक
संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर गावातील घटना
दोन गटात राडा झाल्याने दगडफेकीची घटना
(Buldhana) संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर या गावात देवी विसर्जन रॅलीत दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर गावात ही घटना घडली आहे. दोन गटात राडा झाल्याने दगडफेकीची घटना घडल्याची माहिती मिळत आहे.
अज्ञात व्यक्तीकडून मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली असून दगडफेकीत 5 ते 7 जण जखमी असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेच्यावेळी पाच मंडळांच्या विसर्जन मिरवणूक त्याच ठिकाणी थांबल्या. घटनेची माहिती मिळतात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे.