Kolhapur
महाराष्ट्र
Kolhapur : कोल्हापुरात दोन गटात तुफान दगडफेक
कोल्हापुरात दोन गटात तुफान दगडफेक झाल्याची घटना घडली आहे.
(Kolhapur) कोल्हापुरात दोन गटात तुफान दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. कोल्हापुरातल्या सिद्धार्थ नगर कमानीजवळ ही घटना घडली असून सिद्धार्थनगर परिसरातील उद्यानासमोर मंडळाचा फलक लावण्यावरून तसेच साऊंड, लाईट्सचे स्ट्रक्चर उभे करण्यावरून वाद निर्माण झाला आणि या वादाचे रुपांतर शुक्रवारी रात्री प्रचंड दगडफेकीत आणि वाहनांची तोडफोड करण्यात झाले.
दोन गटांतील या वादात 8 जण जखमी झाले तर पाच ते सहा वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. सुमारे तासभर दोन्ही बाजूने प्रचंड दगडफेक सुरू झाल्याने या परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. परिसरात तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे.