Powai: पवईतील अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेले पालिकेचे पथक आणि पोलिसांवर दगडफेक

Powai: पवईतील अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेले पालिकेचे पथक आणि पोलिसांवर दगडफेक

मुंबई उपनगरातील पवई परिसरात गुरुवारी अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेले कर्मचारी आणि पोलिसांच्या पथकावर जमावाने दगडफेक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

मुंबई उपनगरातील पवई परिसरात गुरुवारी अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेले कर्मचारी आणि पोलिसांच्या पथकावर जमावाने दगडफेक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पवईच्या भीमनगर परिसरात हा प्रकार घडला. यात पाच ते सहा पोलीस जखमी झाल्याचं कळत आहे.

पोलिसांनी कारवाई सुरु केल्यानंतर काही लोकांनी पथकावर दगडफेक सुरु केली. याठिकाणी असलेल्या झोपड्यांवर निष्कासनाची कारवाई करण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या अधिकाऱ्यांना नागरिकांच्या प्रचंड रोषाला सामोरे जावे लागले. जय भीमनगर हा झोपडपट्टीचा परिसर आहे. येथील काही झोपड्या पाडण्यात आल्या होत्या. मात्र, स्थानिकांच्या जमावाने वस्तीच्या तोंडाशी उभे राहून वाट अडवून धरली. त्यानंतर या जमावाने पालिका अधिकाऱ्याच्या दिशेने दगडांचा तुफान मारा केला.

2 महिन्यांपूर्वी या झोपडपट्टी भागात आगीची घटना घडली होती. त्यानंतर या ठिकाणी झोपडपट्टीत राहणाऱ्या रहिवाशांना मुंबई महापालिकेकडून जागा खाली करण्याची नोटीस पाठवण्यात आली होती. आज कारवाईसाठी अधिकारी आले असताना अधिकाऱ्यांवर जमावाने दगडफेक केली. रहिवासी आक्रमक झाल्यानंतर तात्काळ मुंबई महापालिकेने कारवाई थांबवली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com