धावत्या एक्सप्रेसवर दगडफेक; रेल्वे प्रवासी जखमी…

धावत्या एक्सप्रेसवर दगडफेक; रेल्वे प्रवासी जखमी…

Published by :
Published on

सुरेश काटे | सेवाग्राम एक्सप्रेसवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे. या घटनेत प्रवाशी जखमी झाला आहे. यात सुदैवाने एक लहान बाळ बचावले आहे. कल्याण ते ठाकुर्ली दरम्यानही घटना घडली आहे.

ठाकुर्लीहून कल्याण दिशेकडे जाणाऱ्या सेवाग्राम एक्सप्रेसवर दगडफेक झाल्याचा प्रकार समोर आला आहे.सायंकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या हल्ल्यात खिडकीजवळ बसलेला महेश सुरवलकर हा प्रवासी जखमी झाला आहे. या घटनेत त्याच्या डोळ्याला मोठी इजा होण्याचीही शक्यता होती. मात्र दगड त्याच्या डोळ्याच्या खाली लागल्याने त्याचा डोळा थोडक्यात बचावला.

दरम्यान महेश सुरवलकर हा ठाणे येथे राहणारा असून तो एक्स्प्रेसने भुसावळला जात होता. घटनेत जखमी झाल्याने कसारा रेल्वे स्थानकावर प्रथमोपचार करत तो पुढील प्रवासासाठी निघून गेला. याप्रकरणी सदर तरुणाने तक्रार देण्यास नकार दिल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाल्मिक शार्दुल यांनी सांगितलं.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com