दादर फुलमार्केटमध्ये लोकांची तुफान गर्दी
आज सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पा आगमन झाले आहे. बाप्पाची पूजा आणि आरास करण्यासाठी गणेशोत्सवात फुलांची मोठी मागणी असते. आज गणेशोत्सवाच्या निमित्ताने दादर फुलमार्केटमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. अगदी पहाटेपासून नागरिकांनी खरेदीसाठी प्रचंड गर्दी केली होती. फुल मार्केटमध्ये नागरिकांची गर्दी होणार हे माहिती असूनही इथे कुठल्याही प्रकारच्या पोलिस बंदोबस्त दिसला नाही.
दादरच्या फूल मार्केटमध्ये नागरिकांची प्रचंड गर्दी
आजपासून पुढचे दहा दिवस गणेशोत्सवाच्या असणार आहे. पण या गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट आहे. अशावेळी शासनाने घालून दिलेले कोरोनाचे सगळे नियम पाळून राज्यातील नागरिकांना गणेशोत्सव साजरा करावा लागणार आहे. पण लोकांनी नियमांकडे साफ दुर्लक्ष केल्याचं दिसतंय. पहाटे पाच पासून नागरिकांनी दादर फुल मार्केटमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी केली. अनेक लोकांनी मास्क लावलेला नाहीये. तर नागरिक सोशल डिस्टन्सिंगचं देखील पालन करत नाही.
सार्वजनिक ठिकाणी नियमांचं पालन नाही
आपल्या लाडक्या बाप्पाला आणण्यासाठी लोक घरातून निघाले आहेत पण कोविड प्रोटोकॉलचं पालन होताना दिसत नाहीय. विना मास्क संख्या जास्त आहे. एकंदरितच सार्वजनिक ठिकाणी कोव्हिड नियमांचं कोणतंही पालन होताना दिसत नाही.