समाजात द्वेष पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार – गृहमंत्री

समाजात द्वेष पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार – गृहमंत्री

Published by :

त्रिपुरा येथे अल्पसंख्याकांवर झालेल्या कथित हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी राज्यात पुकारण्यात आलेल्या बंदला काही ठिकाणी हिंसक वळण लागले. वाहने आणि दुकानांवर दगडफेक करण्यात आली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा सौम्य वापर केला. त्यानंतर शनिवारी पुन्हा अमरावतीमध्ये भाजपाने बंदचे आवाहन केले होते. दरम्यान दोषींवर कारवाई केली जाणार, तर शांतत राखण्याचे आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलं आहे.

आज अमरावतीमध्ये मोर्चात हिंसक वळण लागल्याचं पहायला मिळालं होतं. या मोर्चाला कोणालाही परवानगी नव्हती, परवानगीही निवेदन देण्यासाठी दिली होती. पालकमंत्र्यांशीदेखील यासंबंधी चर्चा झाली आहे. ते सर्व राजकीय नेत्यांशी बोलून त्यांनासुद्धा हे आंदोलन शांततेत करण्याचे आवाहन करणार आहेत.

दरम्यान, समाजात जर तोड निर्माण करत असेल तर त्यावर कारवाई केली जाईल. भाजप हे मागणी करू शकतात, पण आता तरी शांतता प्रस्थापित करण्याची गरज आहे. फक्त अमरावतीमध्ये असा प्रकार घडला आहे, पण हा प्रकार लवकरच आटोक्यात येईल. तसेच हिंदू आणि मुस्लीम संघटनांनी मदत करणे गरजेचे आहे, तर समाजात द्वेष पसरवणाऱ्या दोषीवर कठोर कारवाई केली जाईल. सोशल मीडियावर शांतता राखावी, असे मला वाटते, असंही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com