बुलडाणा जिल्ह्यात १० ते २० मेपर्यंत कडक लॉकडाऊन

बुलडाणा जिल्ह्यात १० ते २० मेपर्यंत कडक लॉकडाऊन

Published by :
Published on

करोनाची ही साखळी तोडण्यासाठी बुलडाणा येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत १० मे ते २० मेपर्यंत कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बुलडाणा जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये केवळ मेडिकल दुकानांची सेवा वगळता ईतर आस्थापने पूर्णत: बंद ठेवण्यात येणार आहे. जिल्ह्याअंतर्गत एसटी प्रवासी वाहतूक सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. याशिवाय ईतर धार्मिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. तसंच कडक लॉकडाऊन पाळण्याच्या दृष्टीने विशेष आदेश पोलिस विभागालाही देण्यात आले आहे.

जीवनावश्यक वस्तूंसाठीचा सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंतचा वेळ आता रद्द करण्यात आला असून यात फक्त भाजीपाला आणि किराणासाठी होम डिलिव्हरीचा पर्याय दिला आहे. हॉस्पिटल आणि मेडीकल वगळता आता सर्वच काही बंद राहणार आहे. रस्त्यावर विनाकारण फिरण्यावर पूर्वीही बंदी होती आणि त्याची आता कडक अंमलबजावणी केली जाईल, अशी प्रतिक्रिया बुलडाण्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com