मुख्यमंत्र्यांची भेट, नंतर नाराजीनाट्य; Sudhakar Badgujar यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी

मुख्यमंत्र्यांची भेट, नंतर नाराजीनाट्य; Sudhakar Badgujar यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी नाशिकमध्ये आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी नाशिकमध्ये आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले.

त्यानंतर यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया आल्या. यातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून उपनेते सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी वक्तव्य केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

सुधाकर बडगुजर यांनी काल मनातील नाराजी बोलून दाखवली होती. आज नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. ही पत्रकार परिषद सुरु असतानाच त्यांना संजय राऊत यांचा फोन आला. संजय राऊतांनी फोनवरुनच उद्धव ठाकरे यांनी सुधाकर बडगुजरांच्या हकालपट्टीचा आदेश दिल्याचे दत्ता गायकवाड यांना सांगितले आणि त्यानुसार गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत याबद्दल माहिती दिली. तसेच सुधाकर बडगुजर यांच्या नाराजीसंदर्भात आज सकाळी संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देखील दिली होती.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com