Sugarcane Conference
Sugarcane Conference

Sugarcane Conference : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आज जयसिंगपुरात ऊस परिषद

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 24 वी ऊस परिषद
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • 'स्वाभिमानी’ची आज जयसिंगपुरात ऊस परिषद

  • परिषदेत उसाचा दर आणि आंदोलनाची दिशा ठरेल

  • स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 24 वी ऊस परिषद

(Sugarcane Conference) स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आज जयसिंगपुरात ऊस परिषद होणार आहे. या परिषदेला राजू शेट्टी यांच्यासोबत इतर शेतकरी नेते उपस्थित राहतील.

केंद्र सरकार व राज्य सरकार साखर उद्योगाकडे दुर्लक्ष करू लागल्याने साखरेसह उपपदार्थांबाबत चुकीचे निर्णय होऊ लागले असा आरोप राजू शेट्टी यांच्याकडून करण्यात आला आहे. जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रीडांगणावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या 24 व्या ऊस परिषदेचं आयोजन करण्यात आले आहे.

खते, बी-बियाणे, कीटकनाशके, मजुरी, मशागत व तोडणी वाहतूक यामध्ये भरमसाट वाढ करण्यात आली आहे. या ऊस परिषदेमधून आंदोलनाची दिशा ठरणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच यामध्ये दर आणि उसाशी संबंधित इतर मागण्यांवर चर्चा केली जाणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com